Lohagad Fort Information In Marathi|लोहगड किल्ला माहिती मराठी

Lohagad Fort (Iron Fort) Information In Marathi|लोहगड किल्ला माहिती मराठी |
नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातुन जाणून घेणार आहोत विंचूवाच्या शेपटासारखी लांब शेपटी साकारुन, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा, महादरवाजा असे चार मजबूत बांधणीचे दरवाजे, घोड्यांची पागा अशा सर्व गोष्टी एकवटुन पुणे जिल्यातील लोणावळा डोंगररांगेत उभा असलेल्या किल्ले लोहगड बद्दल.Lohagad Fort Information In Marathi (Iron Fort) 


 • किल्ल्यांच्या प्रकारानुसार किल्ले लोहगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. 
 • समुद्रसपाटीपासून किल्ले लोहगडची उंची १०३३ मीटर (३३८९फूट ) एवढी आहे. 

Lohagad-Fort-(Iron Fort)-Information-In-Marathi
Lohagad-Fort-(Iron Fort)-Information-In-Marathi

Lohagad Fort Information In  Marathi पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा पर्वतरांगेत किल्ले लोहगड आपल्याला पाहायला मिळतो. समुद्रसपाटीपासून १०३३ मीटर एवढी उंची असलेला किल्ले लोहगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. 

लोहगड अतिशय मजबूत आणि बुलंद असा किल्ला आहे. पहिल्या सुरत लूटेतील संपत्ती काही काळ किल्ले लोहगडावरच ठेवली होती. लोह म्हणजे लोखंड आणि लोखंडासारखा मजबुत असा हा किल्ले लोहगड. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा पहिले कि किल्ल्याच्या मजबुतीची जाणीव होऊन  जाते. 

किल्ले राजगडला जशी संजीवनी, सुवेळा, पद्मावती माची तशीच किल्ले लोहगडला विंचूकाटा माची. मुख्य गडापासून विंचवाच्या शेपटासारखी अरुंद होत गेलेली कडा म्हणजे विंचूकडा. विंचूकड्याला दोनही बाजुने मजबुत तटबंदी पाहायला मिळते. विंचूकडा माचीमुळे  किल्ले लोहगडला वेगळेच सुंदर रूप मिळून गेले आहे. 

पावसाळ्यात किल्ले लोहगडला भेट देणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. पावसाळ्यात किल्ल्यावरील उंचावरचा भाग हा ढगांनी आणि धुक्यांनी व्यापुन गेलेला असतो. किल्ले लोहगडचे पावसाळ्यातील रूप पाहिले की मन भरुन जाते. पावसाळ्यात रंगबिरंगी फुलांनी आणि हिरव्यागार झाडांनी किल्ला आणखीनच बहरून जातो.

किल्ले लोहगडवरून पवना धरणाचे अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळते.  किल्ले लोहगडावरून आपल्याला जवळच असलेला विसापूर किल्ला व तसेच तिकोना, तुंग अशे किल्ले पाहायला मिळतात.
गडभ्रमंती करण्यासाठी गडाच्या पायथ्यापासूनच पायऱ्या असल्यामुळे चढण अजूनच सोपी होऊन जाते. परंतु पावसाळ्यात काळजी घेऊनच चढण करावी. लोहगड किल्ल्याचा इतिहास। 

Lohagad Fort History In Marathi 


लोहगड किल्ल्याचा इतिहास मराठीमध्ये -
 • किल्ले लोहगडने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव अशा सर्व  राजवटी पाहिल्या.
 • मलिक अहमंदने याने १४८९ मध्ये निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यात किल्ले लोहगडसुद्धा होता.
 • किल्ले लोहगड १४८९ मध्येआदिलशाहीत आला.
 • छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५७ मध्ये लोहगड–विसापूर हे किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले .
 • पुरंदरच्या झालेल्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना किल्ले लोहगड मोगलांच्या स्वाधीन करावा लागला. 
 • किल्ले लोहगड १६७० मध्ये पुन्हा स्वराज्यात आला.
 • शाहूमहाराजांनी १७०३ मध्ये कृपावंत होऊन किल्ले लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला.
 • १७२० मध्ये किल्ले लोहगड पेशव्यांकडे आला. 
 • इंग्रजांनी १८०३ मध्ये किल्ले लोहगडावर ताबा मिळवला.किल्ले लोहगड वर काय पाहाल ? 


लोहगड किल्ला माहिती मराठीमध्ये - मजबुत बांधणी असलेली सुस्थितीमध्ये असलेली द्वारे आजही किल्ले लोहगड आपल्याला पाहायला मिळतात  -
 • गणेश दरवाजा :- गणेश दरवाजा हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. दरवाजाच्या वरच्या बाजुस गणेशाची प्रतिमा आहे. दरवाजा आजही मजबुत आणि सुस्थिती मध्ये पाहायला मिळतो. 
 • महादरवाजा :- महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. महादरवाजा आजही त्याच्या भक्कमपणाची जाणीव करून देतो.
 • नारायण दरवाजा :- नारायण दरवाजा नाना फडणवीस यांनी बांधून घेतला. नारायण दरवाजा हा किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे. 
 • हनुमान दरवाजा :- नारायण दरवाजाच्या समोरच आपल्याला गडाचा चौथा दरवाजा लागतो तो म्हणजे हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजा हा गडावरील सर्वात जुना दरवाजा आहे.  
 • महादेवाचे मंदिर :- किल्ल्यावर आपल्याला महादेवाचे मंदिर दिसते. मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले कि मन प्रसन्न होऊन जाते. 
 • दिंडी बुरुज :- गणेश दरवाजा आतमध्ये आल्यावर आपल्याला दिंडी बुरुजाकडे जाता येते.
 • राजारानी मंदिर :- हनुमान दरवाजामधून थोडेशे पुढे  आलो कि आपल्याला हे मंदिर पाहायला मिळते. 
 • शिवकालीन सभागृह :- राजारानी मंदिराच्या जवळच आपल्याला शिवकालीन सभागृहाचे अवशेष पाहायला मिळतात. 
 • शिलालेख:- गणेश दरवाजा मधुन आतमध्ये आल्यावर आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो. 
 • विंचूकडा :- किल्ले राजगडला जश्या संजीवनी माची,  सुवेळा माची, पद्मावती माची आणि किल्ले तोरणाला जशी बुधला माची, झुंझार माची त्याप्रमाणे किल्ले लोहगडला  विचंवाच्या शेपटासारखी दुरवर पसरलेली माची म्हणजे विंचूकडा. विंचूकडा माचीला सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजुने मजबुत तटबंदी पाहायला मिळते. माचीच्या शेवटी आपल्याला विंचु काटा बुरुज पाहायला मिळतो.  
विंचूकडा-किल्ले लोहगड
विंचूकडा-लोहगड किल्ला

 • किल्ले लोहगड वर आपल्याला  त्रंबक पाण्याचे टाके, हत्ती तलाव व इतर अनेक पाण्याची टाकी पाहायला मिळतात.किल्ले लोहगडला  कसे जाल ?

Lohagad Fort Information In  Marathi - किल्ले लोहगडला भेट द्यायची असेन तर आपल्याला भाजे गावामध्ये यावे लागते व तिथून लोहगडवाडी या गावामधून किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी पोहचता येते.

काय काळजी घ्याल ?  

 • गडाला पायथ्यापासून पायऱ्या असल्यामुळे चढाई सोपी आहे. पावसाळ्यात वाट थोडी घसरणीची होते त्यामुळे काळजी घेऊन चढावे. चप्पल, सॅन्डल घालून गड चढू नये, प्रॉपर ट्रॅकिंग शूज वापरावेत. 
 • गडावर पिण्याच्या पाण्याची सोय असली तरीही  उन्हाळ्याच्या कालावधीत सोबत पाण्याच्या बॉटल ठेवाव्यात. 

मित्रांनो, आम्हाला आशा आहे कि Lohagad Fort Information In Marathi या लेखातुन आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये त्या आम्हाला कळवा. त्याप्रमाणे आम्ही हा लेख अपडेट करत राहू.Post a comment

0 Comments